पाहा व्हीडिओ : 'ब्रेट कॅव्हॅनॉ यांनी तेव्हा माझ्यावर बलात्कारच केला असता, पण...'
Published
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी सुप्रीम कोर्टासाठी नामनिर्देशित केलेले ब्रेट कॅव्हॅनॉ यांची अमेरिकन सिनेटपुढे गुरुवारी चौकशी झाली. त्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले आहेत.
चौकशी दरम्यान त्यांच्यावर आरोप करणाऱ्या ख्रिस्टीन फोर्ड यांनी ब्रेट त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता, असं सांगितलं. मात्र, ब्रेट यांनी या आरोपांचा इन्कार केला. इतकंच नव्हे तर त्यांनी या आरोपांमागे राजकारण असल्याचंही म्हटलं आहे. या चौकशी दरम्यान डॉ. फोर्ड आणि कॅव्हॅनॉ हे दोघंही भावूक झाले होते. याप्रकरणी मतदान होणार असून मगच त्यांना या पदावर नेमण्यात येणार असल्याचं ट्रंप यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)