इंडोनेशिया : भूकंप आणि त्सुनामीनंतरचं विदारक दृश्य - व्हीडिओ
Published
भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीच्या तडाख्यातून सावरण्याचा इंडोनेशिया प्रयत्न करत आहे. इथल्या सरकारने आंतरराष्ट्रीय मदतीसाठी आवाहन केलं आहे.
इंडोनेशियात आलेल्या भूकंपामुळे आतापर्यंत 832 जणांचा बळी गेला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. "त्सुनामीचा इशारा देणारी यंत्रणा निकामी झाली असून इथली आपत्कालीन यंत्रणा यापूर्वीच्या भूकंपाच्या धक्क्यातून सावरलेली नाही", अशी माहिती यापूर्वी इंडोनेशियात भूकंप आलेला असताना तिथे उपस्थित असलेले बीबीसी न्यूज मराठीचे प्रतिनिधी विनायक गायकवाड यांनी दिली.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)