पाहा व्हीडिओ : हिमालयातल्या लडाख भागात अजूनही आहे मूळची आर्य संस्कृती

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : हिमालयातल्या लडाख भागात अजूनही आहे मूळची आर्य संस्कृती
Published

हिमालयातल्या लडाख भागात ब्रोकपा या जमातीचे लोक राहतात. मूळच्या आर्य संस्कृतीतले शुद्ध आर्य आम्हीच शिल्लक राहिलो आहोत, असा या जमातीतील नागरिकांचा दावा आहे.

या जमातीचे गाव सिंधू नदीच्या खोऱ्यात वसले आहे. त्याच भागातल्या इतर जमातींपेक्षा ब्रोकपा जमातीची भाषा आणि प्रथा वेगळ्या आहेत. या जमातीनं आपली शतकांपूर्वीची परंपरा अजूनही कायम जपली आहे. मात्र सध्या रोजगारासाठी या लोकांना धडपड करावी लागत आहे. पर्यटनाला प्रोत्साहन मिळाल्यास या नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी दिपक शर्मा यांचा लेहवरून रिपोर्ट. शूट आणि एडीट - काशिफ सिद्दीकी

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)