पाहा व्हीडिओ : किल्लारी भूकंपानंतर महिलांना पुन्हा उभं करणाऱ्या लक्ष्मीबाई

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : किल्लारी भूकंपानंतर महिलांना पुन्हा उभं करणाऱ्या लक्ष्मीबाई
Published

किल्लारीजवळच्या वडगाववाडीत आजही भूकंपाच्या खुणा ताज्या आहेत. या भूकंपात अनेकांनी आपलं सर्वस्व गमवलं. तिथल्या लक्ष्मी फुलसुंदर यासुद्धा त्यांच्यापैकीच एक.

त्यांचं घरही पूर्णपणे नष्ट झालं. भूकंपानंतर काही दिवस त्यांना शेतात राहावं लागलं. मात्र, त्या खचल्या नाहीत. भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी त्या पुढे सरसावल्या. त्यांनी अनेकांना 'भूकंपरोधक घरं' उभारण्यास मदत केली.

बीबीसी न्यूज मराठीचे प्रतिनिधी राहुल रणसुभे यांचा रिपोर्ट.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)