पाहा व्हीडिओ : इंडोनेशियात भूकंपानंतर आता सामना चिखल, गाडलेली घरं आणि मृतदेहांशी
इंडोनेशियातल्या भूकंपानंतर मृतांचा आकडा आता 1400पेक्षा जास्त झाला आहे. सामूहिक कबरींमध्ये 500पेक्षा जास्त मृतदेहांचं दफन करण्यात आलं आहे.
इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी दुसऱ्यांदा या प्रदेशांचा दौरा केला. साधनसामुग्री आणि मदत पोचत असली तरी आणखी गोष्टींची गरज आहे असं ते म्हणाले.
पालूमध्ये अन्नपाण्याच्या तुटवड्यामुळे लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. आहेत ती संकटं कमीच होती की काय म्हणून इंडोनेशियातल्या एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.
पालूपासून हा ज्वालामुखी एक हजार किलोमीटर दूर असल्याने लोकांना हलवण्याची गरज नाही असं बचाव यंत्रणांचं म्हणणं आहे.
बीबीसीचे प्रतिनिधी जोनाथन हेड आणि हायवेल ग्रिफिथ यांचा रिपोर्ट.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)