पाहा व्हीडिओ : सीतव्वा जोडट्टींनी केला देवदासी प्रथेविरोधात केला एल्गार

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : सीतव्वा जोडट्टींनी केला देवदासी प्रथेविरोधात केला एल्गार
Published

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमावर्ती भागातल्या देवदासींच्या समस्या आजही संपलेल्या नाहीत.

देवाचं कार्य म्हणून धार्मिक लेप चढवलेल्या या परंपरेनं स्त्रियांचं खूप शोषण केलं. वयात येण्याच्या काळात आणि बहुतांश वेळेला जन्मावेळेसच स्त्रियांना देवाला वाहिलं जात आहे.

एकप्रकारे देवाशी लग्नच लावलं जातं. म्हणून तिला देवदासी म्हणतात. जोगवा मागून, धार्मिक कार्यक्रमांना जाऊन या देवदासी गुजराण करतात.

पुरुषाशी लग्न करता येत नसल्यानं कोणा यजमानाच्या आधारानं त्या जगतात आणि बहुतांश वेळेला इतर पुरुषांच्या लैंगिक वासनेला बळी पडतात.

देवदासी बहुसंख्येनं दलित समाजातील स्त्रिया आहेत. त्यातल्या कित्येक वेश्याव्यवसायाकडे ओढल्या गेल्या आहेत.

रिपोर्टर - मयुरेश कोण्णूर

शूट आणि एडिट - शरद बढे

भाषांतर सहाय्य - विलास अध्यापक

निर्मिती - जान्हवी मुळे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)