पैशाची गोष्ट - जाणून घ्या की पेट्रोलच्या किमती कशा ठरतात
Published
अलीकडे सप्टेंबरमध्ये पेट्रोलच्या किमतींनी काही शहरांमध्ये नव्वदी गाठली. त्यानंतर केंद्र सरकारने अडीच रुपयांनी कर कमी करून थोडा दिलासा दिला.
पण, किंमती अजूनही चढ्याच आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमतीचा मुद्दा आहेच. त्याचबरोबर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारच्या करांचाही मुद्दा वादात आहे. कारण भारताचे शेजारी देश पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश भारतापेक्षा स्वस्त दरात पेट्रोल विकतात. मग भारतात पेट्रोलचा दर एवढा जास्त का?
पैशाची गोष्टमध्ये जाणून घेऊया पेट्रोल डिझेलच्या किमती ठरतात कशा ते.
- निवेदक - ऋजुता लुकतुके
- लेखक - दिनेश उप्रेती
- निर्माती - सुमिरन प्रीत कौर
- एडिट - राजन पपनेजा
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)