पाहा व्हीडिओ : शबरीमाला : मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर निदर्शकांनी अडवल्या गाड्या

व्हीडिओ कॅप्शन, शबरीमाला : मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर निदर्शकांनी अडवल्या गाड्या
Published

शबरीमाला मंदिराकडे येणाऱ्या गाड्या अडवण्यात येत आहेत. त्या गाड्यांमध्ये तरुण महिला आहेत का हे पाहिलं जात आहे.

ब्रह्मचारी मानल्या जाणाऱ्या अयप्पा यांच्या मंदिरात मासिक पाळीच्या वयादरम्यानच्या महिलांना इतकी वर्षं प्रवेश दिला जात नव्हता.

यापूर्वी मंदिरात प्रवेश करणाऱ्या त्या वयोगटातल्या महिलांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयानं 28 सप्टेंबरला शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याची महिलांना मुभा दिली आहे.

यानंतर भाजप समर्थक गटांनी निदर्शनं सुरू केली आहे.

बीबीसीच्या प्रतिनिधी प्रमिला कृष्णन यांचा हा रिपोर्ट

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)