पाहा व्हीडिओ: अमृतसर रेल्वे अपघातात बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांची वणवण
Published
अमृतसर येथे झालेल्या अपघातात 62 जण मृत्युमुखी तर अनेक जण जखमी झाले. तर अनेक जण बेपत्ता देखील आहेत. त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत.
धोबीघाट मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम सुरू होता. काही जण मैदानालगतच्या रेल्वे मार्गावर उभं राहून हा कार्यक्रम पाहात होते. त्यावेळी रेल्वे आली आणि रेल्वेमार्गावर उभे असलेले लोक चिरडले गेले.
जखमींना शहरातील गुरूनानक रुग्णालय आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत.
रिपोर्टर - सरबजित धालिवाल
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)