पाहा व्हीडिओ : अजिंठातल्या गुहाचित्रांचं नवं रुप साकारणारे हात
औरंगाबादजवळच्या अजिंठा लेण्यांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश होतो. मात्र कालौघात या लेण्यांमधील अनेक चित्रं नामशेष होण्याच्या मार्गावर होती.
चित्रकार एम.आर. पिंप्रे आणि विजय कुलकर्णी यांनी अस्तंगत होत चाललेल्या चित्रांचं पुनरुज्जीवन केलं आहे.
औरंगाबादपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या अजिंठा लेण्यांचा परिसर अत्यंत रमणीय आणि घोड्याच्या नालीच्या आकाराचा आहे. येथील लेणींकडे बौध्द वास्तूशास्त्र, भित्तीचित्रं आणि शिल्पकृतीचा आदर्श नमुना म्हणून पाहिलं जातं.
1899मध्ये जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याला वाघाच्या शिकारीदरम्यान या लेण्यांचा शोध लागला होता.
युनेस्कोने 1983मध्ये या लेण्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे.
शूट-एडिट आणि रिपोर्ट - राहुल रणसुभे
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)