पाहा व्हीडिओ : गुजरातमध्ये आजही धावतेय 104 वर्ष जुनी नॅरोगेज ट्रेन

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : गुजरातमध्ये आजही धावतेय 104 वर्ष जुनी नॅरोगेज ट्रेन
Published

गुजरातमध्ये सयाजीराजे गायकवाड यांनी 104 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही रेल्वे नॅरो गेजवर धावणाऱ्या भारतातल्या दोन गाड्यांपैकी एक आहे.

गुजरातमधल्या वघई ते बिलीमोरा या 63 किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रेन धावते. या ट्रेनमुळे अनेकांच्या उद्योगधंद्याला आधार मिळाला आहे. इथल्या आदिवासी नागरिकांसाठी ही रेल्वे लाईफलाईन म्हणूनच ओळखली जाते. या ट्रेनला इथले लोक बापूंची ट्रेन असं देखील म्हणत.

बीबीसी न्यूज मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांचा रिपोर्ट.

शूट आणि एडीट - शरद बढे.

प्रोड्युसर - जान्हवी मुळे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)