अमेरिकेच्या निर्बंधामुळे इराणच्या बाजारपेठा डबघाईला
Published
अमेरिकेने इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध सोमवारपासून अंमलात आलेत. या निर्बंधांमुळे इराणचा तेल व्यापार आणि बँकिंगसारख्या क्षेत्रांवर परिणाम होतील.
इराणमधल्या बाजारपेठांमध्ये देशोदेशीचे पर्यटक येतात. इथल्या इसफहान शहारातही जुनी बाजारपेठ आहे. पण, अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे या शहरातील बाजारपेठेवर गंभीर परिणाम होत आहेत. निर्बंधांची झळ बसू लागल्यावर इसफहान शहरांत नागरिकांनी निदर्शनं केली. यावर इराण सरकारने उपयायोजना केली मात्र त्याचे परिणाम अजून तरी जनतेपर्यंत पोहचलेले नाहीत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)