पहिल्या महायुद्धातल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ 'खादी पॉपी'

व्हीडिओ कॅप्शन, पहिल्या महायुद्धातल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ 'खादी पॉपी'
Published

पहिल्या महायुद्धात ब्रिटीशांकडून लढलेल्या एकूण सैनिकांपैकी 13 लाख सैनिक भारतीय होते. यातले हजारो सैनिक मारले गेले. या सैनिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतिपदक तयार करण्यात आलं आहे.

हे खादीचं असून यालाचा पॉपी म्हटलं जातं. येत्या 11 नोव्हेंबरला पहिल्या महायुद्धाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या महायुद्धातील भारतीय सैनिकांचं योगदानही मोठं आहे.

यासाठी UKमध्ये इरफान मलिक आणि लॉर्ड गधिया या युद्धात लढलेल्या आपल्या नातेवाईकांच्या आठवणी जागविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. मलिक भारतीय सैनिकांवर प्रदर्शनांचं आयोजन करतात. तर, लॉर्ड गधिया खादी पॉपीचं वितरण करत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)