40 हजार वर्षांपूर्वी मानवाने रेखाटलं होतं गाईचं चित्र

व्हीडिओ कॅप्शन, आशियाई गाईचं 40 हजार वर्षांपूर्वीचं चित्र सापडलं
Published

कोणत्याही प्राण्याचं हे जगातलं पहिलंच रेखाचित्रं आहे. ते सापडलं आहे इंडोनेशियातल्या पूर्व कलिमंथन, बौर्निओ इथल्या गुहेत. इथल्या गुहेत पोहोचणं हेच अतिकठीण होतं. पण संशोधकांनी ही मोहीम यशस्वी केली.

वर्षानुवर्षं पाणी झिरपल्यानं ही चित्रं काहीशी धूसर झाली आहेत. पण त्यात साठलेल्या रसायनांमुळे त्यांचा काळ ठरवणं शक्य झालं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)