पहिलं महायुद्ध : इथं गाडले आहेत युद्धातील अनेक मृत सैनिक

व्हीडिओ कॅप्शन, बेल्जियममधल्या या जागेत पहिल्या महायुद्धातले मृतदेह गाडले आहेत
Published

बेल्जियममधल्या वेट चार्टर गावातल्या फ्लांडर्स फिल्ड या जागेत पहिल्या महायुद्धातल्या काही लढाया झाल्या. या जागेत अनेक सैनिकांना गाडण्यात आलं आहे. या जागेत सध्या उत्खनन सुरू आहे.

या उत्खननात युद्धकाळातले अवशेष आढळत आहेत. इथे 30 सैनिकांचे मृतदेह आढळतील असं संशोधकांना वाटलं होतं. मात्र, आतापर्यंत इथे 128 ब्रिटिश सैनिकांच्या मृतदेहांचे अवशेष सापडलेत. या सैनिकांच्या अवशेषांचं सन्मानपूर्वक दफन करण्यात येणार आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)