'भाकऱ्या थापण्यापेक्षा मला क्रिकेटमध्ये करिअर करायचंय'
Published
जमाइमा ही केवळ 17 वर्षांची आहे. तिने सध्या पाकिस्तानच्या पेशावरमधल्या क्रिकेट सुपर लीगमध्ये भक्कम कामगिरी केली आहे.
गरीबीमुळे सुरुवातीला तिला प्रशिक्षकाकडून ट्रेनिंग घेता आलं नाही. तेव्हा तिच्या बाबांनी तिला क्रिकेट खेळायला शिकवलं. पाकिस्तानमधल्या 'फाटा' भागात जमाइमा लहानाची मोठी झाली.
"सुरुवातीला हे सोपं नव्हतं. लोकांना तर माझ्या ट्रॅकसूटवरच आक्षेप होता. ते म्हणायचे की ही बुरख्यात राहणार नाही. माझ्या बाबांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. ते म्हणतात जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तू कुणाचीही पर्वा करू नको," असं ती सांगते.
जमाइमा आता पाकिस्तान महिला क्रिकेटची उगवती क्रिकेटर आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)