नरेंद्र मोदींनी भारत-पाक प्रश्नावर चर्चेचा पर्याय खुला ठेवावा : मेहबुबा
Published
काश्मीरमध्ये विधानसभा विसर्जित झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. भाजप-PDP सरकारच्या माजी मुख्यमंत्री आणि PDPच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आता मोदींनाच टोला लगावला आहे. तसेच कर्तारपूर कॉरिडॉरचं त्यांनी स्वागतं केलं आहे. तसेच नियंत्रण रेषेच्या पलीकडे असलेल्या शारदा पीठापर्यंतचा मार्ग निर्माण करणं काश्मिरी पंडितांसाठी महत्त्वाचा राहील, असंही त्या म्हणाल्या आहे.
काश्मीरप्रश्नी वाजपेयींकडे असलेली दूरदृष्टी मोदींकडे नाही असं त्या म्हणाल्या. मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चेचा मार्ग सुरू ठेवण्याची गरज आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बीबीसीचे झुबैर अहमद यांच्याशी त्या बोलत होत्या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)