तेलंगणा निवडणूक : हातमाग कामगारांमध्ये सरकारबद्दल का आहे नाराजी?

व्हीडिओ कॅप्शन, तेलंगणा निवडणूक : हातमाग कामगारांमध्ये सरकारबद्दल का आहे नाराजी?
Published

तेलंगणात आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेलंगणातल्या वारंगल जिल्ह्यातलं कोठावाडा हे गाव हातमाग कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. इथं 5 वर्षांपूर्वी 5000 कामगार होते, मात्र आता 200 कामगारच उरले आहेत.

हातमाग व्यवसायात महिला आघाडीवर आहेत. ज्या महिलांना हातामागाचं काम मिळत नाहीत त्या विड्या वळण्याचं काम करतात. स्वतंत्र तेलंगणासाठी आंदोलन केल्याचा दावा इथले कामगार करतात. मात्र, त्यांना अजूनही न्याय मिळाला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

बीबीसी न्यूजसाठी दिप्ती बत्तिनी यांचा रिपोर्ट.

शूट-एडीट - नवीन कुमार.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)