मांसाहारामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतोय का?

व्हीडिओ कॅप्शन, मांसाहार करणाऱ्यांनो सावधान! पर्यावरणाचा विचार केलात का?
Published

मांसाहार करणाऱ्यांना आता खाताना पर्यावरणाचाही विचार करावा लागणार आहे. कारण बीफ, मटण, चिकन आणि इतर मांसाहारी पदार्थांमुळे हरित वायूंच्या उत्सर्जनात भर पडते आहे.

या संबंधीचा अहवाल नुकताच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार बीफ, मटण, चिकन, कोळंबी, मासे, अंडी यांसारख्या मांसाहारी पदार्थांमधल्या प्रथिनांमधून हरित वायूंचं उत्सर्जन होतं.

या वायूंमुळेच जागतिक तापमान वाढीत भर पडते. मात्र शाकाहारी पदार्थांमधल्या प्रथिनांमधून या वायूंचं उत्सर्जन होण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे मांसाहाराऐवजी शाकाहारावर भर द्या, असा सल्ला वैज्ञानिकांनी दिला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)