महिलांच्या या आजाराविषयी तुम्हाला माहिती आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, महिलांच्या या आजाराविषयी तुम्हाला माहिती आहे का?
Published

या आजाराचं नाव आहे Endometriosis. या आजारात गर्भाच्या ऊती आणि पेशी गर्भाशयाच्या बाहेर पसरतात.

यामुळे महिलांना वेगवेगळे त्रास होतात. जसं की अनियमित मासिक पाळी, खूप रक्तस्त्राव आणि वेदना होणं. मासिक पाळीआधी स्तन सुजणं आणि वेदना होणं. युरिन इंफेक्शन, सेक्स करताना आणि नंतर वेदना होणं.

पोटाच्या खालच्या भागात वेदना होणं. अशा महिलांना बाळ होण्याची शक्यता फार कमी असते.

पहिल्या स्टेजमधल्या Endometriosisचं सोनोग्राफीमध्ये निदान होतं.

त्यानंतर मात्र लेप्रोस्कोपीची मदत घेतली जाते. काही महिलांना एका शस्त्रक्रियेनंतर आराम मिळतो. तर काहींना 3-4 शस्त्रक्रिया कराव्या लागू शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)