कुंभमेळ्यातली स्वच्छता करतेय महाराष्ट्रातली मनुष्यरहित बोट - पाहा व्हीडिओ
Published
प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात नदीत जमा झालेला कचरा हटवण्याचं काम एक मनुष्यरहित बोट करते आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातल्या एका कंपनीनं ही बोट बनवली आहे. यापूर्वी पुण्यात गणपती विसर्जनासाठी नदीतला कचरा हटवण्यासाठी या बोटीचा वापर करण्यात आला होता.
रिमोट कंट्रोलद्वारे नदीच्या किनाऱ्यावर बसून ही बोट नियंत्रित करता येते. भविष्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बचाव कार्यातही ही बोट वापरता येऊ शकणार आहे.
बीबीसीचे प्रतिनिधी शुभम किशोर यांचा रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)