न्यूझीलंड मशीद हल्ला: पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांची विशेष मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, न्यूझीलंड मशीद हल्ला: पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांची विशेष मुलाखत
Published

न्यूझीलंडमधल्या ख्राईस्टचर्च हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या कथा हेलावून टाकणाऱ्या आहेत. पण त्या हल्लेखोराला हवी असलेली प्रसिद्धी आपण मिळू देणार नाही, त्याला जो काय संदेश द्यायचा होता, तो देऊ देणार नाही, अशी भूमिका न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी घेतली आहे.

"मी जगातल्या एका अत्यंत शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक देशाची मी पंतप्रधान आहे. एक असा देश जिथे 200 वंशाचे लोक राहतात, 160 भाषा बोलल्या जातात. एक खुल्या मनाचा देश म्हणून आमची जी ओळख आहे त्याचा मला अभिमान आहे. आणि आमच्या या वैविध्यपूर्ण ओळखीमुळेच या दहशतवाद्याने त्याच्या या कृत्यासाठी न्यूझीलंडची निवड केली. त्यामुळे साहजिकच मला धक्का बसला. की इथे ही घटना कशी काय घडली?" असा सवाल त्या विचारतात.

पाहा बीबीसीला दिलेली ही खास मुलाखत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)