असं गाव जिथं बाळ जन्माला घालण्यास बंदी आहे - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, असं गाव जिथं बाळ जन्माला घालण्यास बंदी आहे - पाहा व्हीडिओ
Published

माफी डोव्ह हे पश्चिम आफ्रिकेतल्या घानामधील एक गाव आहे, जिथं आजही बाळ जन्माला घालण्यास बंदी आहे.

"मला 9वा महिना सुरू आहे, पण मी माझ्या गावात बाळाला जन्म देऊ शकत नाही," असं गावातील महिला हॅना कोसिना सांगतात.

या गावात एखाद्याला जन्म देणं देवाविरुद्ध आणि निषिद्ध मानलं जातं.

"आमचे पूर्वज जेव्हा इथं आले तेव्हा एक आकाशवाणी झाली. 'ही पवित्र भूमी आहे. इथं राहायचं असेल तर काही नियम पाळावे लागतील. ते नियम म्हणजे, इथं कुणीही बाळास जन्म देऊ शकत नाही. इथे कुणीही जनावर पाळू शकत नाही आणि कुणाला दफनही करू शकत नाही," असं गावातील नागरिक क्वॉम सिदित्से बिनुआ सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)