जालियनवाला बाग हत्याकांड : 100 वर्षांनंतरही व्रण ताजे

व्हीडिओ कॅप्शन, जालियनवाला बाग
Published

13 एप्रिल 1919 या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांडात शेकडो लोक मारले गेले होते.

शंभर वर्षं लोटल्यानंतर ब्रिटन सरकारनं या घटनेबद्दल माफी मागावी ही मागणी गेले काही दिवस जोर धरत होती. ब्रिटिश संसदेत बुधवारी केलेल्या भाषणात पंतप्रधान थेरेसा मे यांनी या हत्याकांडाबद्दल खेद व्यक्त केलाय.

पण त्यांनी उघडपणे माफी मात्र मागितली नाही. आज 100 वर्षांनंतर अमृतसरमधल्या पीडित कुटुंबांचं काय म्हणणं आहे हे दाखवणारा अरविंद छाब्रा यांचा हा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)