कोरोना व्हायरसमुळे तरुणांचे मृत्यू वाढलेत का? #सोपीगोष्ट 118
Published
कोव्हिडचा धोका लहान मुलांना आणि वृद्धांना जास्त आहे असाच आतापर्यंत आपला समज होता. पण म्हणून तरुण वर्गाला याचा धोका नाहीय का?
आपण जर महाराष्ट्राची आकडेवारी नीट पाहिली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की संसर्गाचं सर्वाधिक प्रमाण हे तरुणांमध्ये आहे.
आणि फक्त संसर्गाचंच नाही तर तरुणांमधल्या मृत्यूंचंही प्रमाण काळजीत टाकणारं आहे. असं का घडतंय? तरुणांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात संसर्ग का होतोय? त्यांचे मृत्यू होण्यामागे काय कारणं आहेत, आणि हे टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत सोपी गोष्टमध्ये.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)