लॉकडाऊनच्या काळात कंपनीने केली राहायची सोय, बनवत आहे सॅनिटरी नॅपकिन
Published
कोरोना व्हायरसमुळे जगभरात सगळीकडेच उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आहे. टिकून राहण्यासाठी अनेकांनी अभिनव कल्पना साकारल्या. युगांडातील एक कंपनी पुनर्वापर करता येतील असे सॅनिटरी नॅपकिन बनवते. या कंपनीसमोरही लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी वर्गाला कारखान्यात आणण्याचं आणि पर्यायाने कारखाना सुरू ठेवण्याचं आव्हान होतं.
पण, त्यावर कंपनीने मार्ग शोधला. महिला कर्मचारी वर्गाची राहण्याची सोय त्यांनी कारखान्यात केली. यातून महिलांना रोजगार मिळाला, कारखाना सुरू राहिला. आणि कंपनीची उलाढालही वाढली. लॉकडाऊनमध्ये कारखाना सुरू ठेवण्याचा हा नवा मंत्र कंपनीने जगालाच दिला आहे.
बीबीसीचा खास रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)