पाठीच्या कण्याला दुखापत, तरीही पॉला कशी करणार इंग्लिश खाडी पार?
इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशांच्या दरम्यान असलेली इंग्लिश खाडी पोहत पार करण्याच्या पॉला क्रेग यांच्या विक्रमाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. ही स्पर्धा वेटसूट न घालता करायची आहे.
56 वर्षांच्या पॉला यांच्या पाठीच्या कण्याला वीस वर्षांपूर्वी दुखापत झाली होती, त्यानंतर त्यांना अपंगत्व आलं. पण तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही.
अपघातापूर्वी त्या मॅरेथॉन रनर होत्या. पण नंतर त्यांनी लंडनच्या मेट्रोपोलीटन पोलीसमध्ये मोठ्या हुद्द्यावर नोकरी करत आपली कारकीर्द गाजवली.
त्यांचा इंग्लिश खाडी पार करण्यासाठीचा रिले स्पर्धेचा सराव गेले काही महिने सुरू आहे. त्या सहाजणांच्या टीममध्ये सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा पार पडल्यावर त्या अपंगत्व असूनही इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या महिला असतील.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)