सलमान खान म्हणतो मी निवडणूक लढवणार नाही किंवा प्रचार करणार नाही #5मोठ्याबातम्या

सलमान खान

फोटो स्रोत, STR/AFP/Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या अशा :

1. सलमान खान म्हणतो ना मी निवडणूक लढवणार, ना प्रचार करणार

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इंदौर मतदारसंघातून सलमान खान लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याविरोधात निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्या चर्चेला सलमान खाननेच उत्तर दिल्यानंतर पूर्णविराम मिळाला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

सलमान खान ट्विट केलं आणि सांगितलं की मी निवडणूक लढवणार नाही किंवा कोणत्याच पक्षाचा प्रचार करणार नाही. हे वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

2. धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली असं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

धवलसिंह मोहिते पाटील हे प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. नुकताच राष्ट्रीवादीतून भाजपमध्ये गेलेल्या रणजितसिंह मोहिते पाटलांचे ते चुलत बंधू आहेत. ते त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जातात. माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून तिकिट मिळण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

3. पंतप्रधान मोदींचा मार्ग निर्धोक - शिवसेना

'बसपाच्या अध्यक्षा मायावती आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत. पंतप्रधानपदाच्या या दोन संभाव्य व स्वप्नाळू उमेदवारांनी माघार घेतली यातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा धाक जाणवतो. पंतप्रधान पदासाठी मोदी यांचा मार्ग निर्धोक आहे व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय पक्का आहे,' असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे. माघारीचे शुभसंकेत या शीर्षकाखाली हा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोदींच्या काळात आर्थिक विकासाचा दर कमी झाला आहे

या माघार नाट्याचे महत्त्व इतकेच की, पवार व 'बहन' मायावती हे दोघे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार होते. निदान पंतप्रधानपदाचे स्वप्न तरी ते पाहत होते, पण पवारांनी माढ्यातून व मायावती यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले असं सामनाने म्हटलं आहे.

4. दिवसाला 9 हजार रुपये हवेतच, टीसींना अजब फर्मान

लोकलमध्ये विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करून महसुलात वाढ करावी यासाठी तिकिट निरीक्षकांना (टीसी) अजब फर्मान देण्यात आलं आहे. दिवसाला 9 हजार रुपये हवेतच असे आदेश टीसींना देण्यात आले आहेत.

मुंबई रेल्वे

फोटो स्रोत, Getty Images

नियमभंग करणाऱ्या प्रवाशांकडून दिवसाला ४ ते ५ हजार रुपये जमणे अशक्य असताना थेट ९ हजार रुपयांचे लक्ष्य टीसींना देण्यात आले असून, ते गाठणे अशक्य असल्याचा दावा टीसींकडून करण्यात येत आहे. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.

5. भिवंडीतून पुन्हा दहावीचा पेपर फुटला

गेल्या वर्षीची दहावीची परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे गाजल्यानंतर यंदाही परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटीचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. बुधवारी झालेल्या इतिहासाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका जवळपास तासभर आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर सापडली असून त्यापूर्वी विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिकाही परीक्षेपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी खासगी शिकवणी चालकाला अटक केले आहे.

गेल्या वर्षी परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना व्हॉटसअ‍ॅपवर मिळण्याचा प्रकार दहावीच्या परीक्षेत घडला होता. हे वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)