ती वजन कमी करायला गेली आणि बॉडी बिल्डर झाली

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - ती वजन कमी करायला गेली आणि बॉडी बिल्डर झाली
Published

मधू झा यांची ही प्रेरणाजायी गोष्ट. त्यांना 'छोटा हत्ती' म्हणून चिडवलं जायचं. आता त्यांच्याकडे सिक्स पॅक्स अॅब्ज आहेत.

मधू झा खूप लठ्ठ होत्या. आईवडिलांना त्यांची काळजी वाटायची. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्यांना जीमला पाठवण्यात आलं.

पहिल्यादिवशी वर्कआऊट केल्यावर त्यांचं अंग इतकं दुखू लागलं की त्या दुसऱ्या दिवशी जीमला गेल्याच नाहीत. पण महिनाभर जीमला केल्यावर त्यांना व्यायामाचं व्यसनं लागलं, असं त्या सांगतात.

"मी लठ्ठ होते. काहीही खात होते. जंक फूड मला फार आवडत असे. इतकंच काय मी दारूही प्यायचे. विश्वास बसणार नाही माझं वजन 85 किलो झालं होतं," असं मधू झा यांनी बीबीसीला सांगितलं.

नोएडामध्ये झालेल्या फिटलाईन क्लासिक फिटनेस स्पर्धेत मधू झा अंतिम फेरीत पोहोचल्या.

त्यानंतर नॅचरल बॉडी बिल्डिंग युनियन इंटरनॅशनलच्या प्रो कार्डधारक त्या पहिल्या महिला बनल्या. प्रो कार्ड असणं याचाच अर्थ बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्या आता भारताचं प्रतिनिधित्व करू शकतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)