पाहा व्हीडिओ: जीव धोक्यात घालून उत्तर कोरियात गेलेल्या हेराची कथा
दक्षिण कोरियाचे एक गुप्तहेर पार्क चे-सिओंना हे उत्तर कोरियात हेरगिरी करण्यासाठी गेले. तिथं ते अनेक मोठ्या नेत्यांना भेटले.
आता त्यांच्या आयुष्यावर 'द स्पाय गॉन नॉर्थ' सिनेमा येतोय. उ. कोरियात जर माझी खरी ओळख समोर आली असती तर त्यांनी माझा गळाही चिरला असता असं ते सांगतात.
पार्क सांगतात की ते उ. कोरियाच्या सर्वेसर्वांना भेटले होते. मी जेव्हा किम जाँग इल यांना भेटलो तो क्षण मला पूर्ण आठवतो. शत्रू राष्ट्रात तुम्हाला सगळं डोक्यात ठेवायचं असतं.
देशाच्या निवडणुकीत उ. कोरियाच्या हस्तक्षेप त्यांनी उघडकीस आणला. पण त्यांना त्यांच्या या कामगिरीचं बक्षीस मिळालं नाहीच. शिवाय त्यांना डबल एजंट ठरवण्यात आल्याचं ते सांगतात. त्यामुळे त्यांना तुरुंगात देखील जावं लागलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)