अवघ्या काही मिनिटात नखं लांब करता आले तर...? पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - लांब नखांची अशी फॅशन तुम्ही पाहिली आहे का?
Published

नखं सुंदर ठेवण्यासाठी मार्केटमध्ये नवा ट्रेंड आला आहे. यामध्ये कृत्रीमरीत्या नखांना लांब केलं जात आहे. पण असं केल्यावर खूप काळजी घ्यावी लागते.

नखं लांब करणं म्हणजेच नेल एक्सटेंशन करताना आधी नखं कापली जातात. त्यांचा आकार नीट केला जातो. त्यानंतर नखांची सफाई करतात.

यामध्ये दोन प्रकार आहेत - एक जेल आणि दुसरा अॅक्रेलिक.

असं नेल एक्स्टेंशन केल्याने महिनाभर त्यांची काहीही चिंता करावी लागत नाही. याचा खर्च एक ते पाच हजार रुपये इतका आहे. पण त्याचे दुष्परिणामही आहेत, असं डॉक्टरांचं मत आहे.

पाहा आणि समजून घ्या.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)