मुंबई लोकल अपघातात गमावलेला हात त्याला असा परत मिळाला - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, लोकल अपघातात गमावलेला हात चयांकला परत मिळाला...
Published

10 एप्रिल 2018... चयांक कुमार नेहमीप्रमाणेच ट्रेननं कॉलेजला जायला निघाला होता. मात्र ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना त्याचा पाय घसरला.

चयांक ट्रेन आणि ट्रॅकच्या मध्ये अडकला. ट्रेन त्याच्या डाव्या हातावरून गेली आणि त्याचा हात कोपरापासून वेगळा झाला.

चयांकला वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार करण्यात आले. पण त्याचबरोबर शस्त्रक्रिया करून चयांकचा तुटलेला हातही जोडला गेला.

चयांकला हात मिळण्याची ही प्रक्रिया नेमकी होती कशी?

पाहा व्हीडिओ

हेहीपाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)