पाहा व्हीडिओ : या कारणांमुळे महिलांना पुरुषांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात
Published
एक सारख्याच वस्तूंसाठी महिलांना पुरुषांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. महिलांचं उत्पन्न पुरुषांपेक्षा कमी असल्यानं त्यांना तारण किंवा कर्ज जास्त दरानं घ्यावं लागतं. असं का?
एक कारण म्हणजे महिलांच्या वस्तूंच्या जाहिरातींवरील खर्च. दुसरं म्हणजे, महिलांच्या वस्तूंच्या पॅकिंगचा खर्च यामुळे त्यांच्या वस्तू महाग असतात. तज्ज्ञांच्या मते वस्तूच्या दिसण्याकडे त्या जास्त लक्ष देतात.
भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत 65 टक्केच पगार मिळतो, असं Center for Sustainable Employmentने प्रसिद्ध केलेल्या State of Working India-2018 या अहवालात समोर आलं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)