पाहा व्हीडिओ : अशी हायटेक पँट कधी पाहिलीत का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : अशी हायटेक पँट कधी पाहिलीत का?
Published

UKमधल्या ब्रिस्टॉल विद्यापीठात सुरू आहे एक संशोधन...हायटेक पँटवर. ही पँट विकलांग आणि वृद्धांना कोणाच्याही आधाराशिवाय चालण्यास मदत करेल.

या पँटमध्ये कृत्रिम स्नायू आहेत. त्याचा उपयोग विकलांग आणि वृद्ध व्यक्तींना होईल.

ही पँट तयार करण्यासाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कृत्रिम स्नायूमुळे ती घालणं आणि काढणं अगदी सोपं आहे. बटण दाबलं की पँटचा आकार बदलतो.

यावर आणखी संशोधनासाठी 20 लाख पौंडांची गरज आहे. 'The Wrong Trousers' सिनेमावरून या पँटचं नाव 'The Right Trouser' असं ठेवलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)